Type Here to Get Search Results !

बोरी ते गोहगाव हाडे रस्ता गेला वाहून, नागरिकांचे बेहाल, संपर्कच तुटला,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

रिसोड: काल बोरी, गोहगाव हाडे व परिसरात ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.गोहोगाव हाडे हे गाव रिसोड तालुक्याचे शेवटचे टोक असून गोहोगाव हाडे ते बोरी रस्त्यावर एक पूल होता. तो पूल अति पावसाच्या पुराने  वाहून गेला आहे. रस्ताही पुराने खरडून गेल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांची शेती असून शेती पेरणीसाठी शेतकऱ्यांना रस्त्याने जाणे कठीण झाले असून शेतीची पेरणी कशी व कधी करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड किंवा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रिसोड यांच्याकडे आहे हे सध्या नागरिकांना माहित नाही. त्याबाबत दोन्ही विभागाने या रस्त्याबाबत दखल घेऊन तात्काळ दुरुस्ती करावी व शेतकन्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी गोहोगाव हाडे येथील रहिवासी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उपतालुकाप्रमुख डॉ.समाधान काठोळे यांनी केली आहे.




* शेतकरी आणि नागरिकांची मागणी तात्काळ पाहणी करुन रस्ते व पुलाची दुरुस्ती करावी.

* वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी.

* शेतकन्यांच्या पेरणीचे नियोजन लक्षात घेऊन तातडीने काम करावे.

प्रशासनाने त्वरित सदर रस्त्याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोल करू असा इशारा दिला आहे. 


Post a Comment

0 Comments

Top Post Ad