आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
मुंबई: राज्यातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्या कामकाजाचे अधिक प्रभावी नियोजन करण्यासाठी जबाबदाऱ्यांचे फेरवाटप करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महसूल विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
या निर्णयानुसार जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्या जबाबदाऱ्यांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले असून, जिल्हा प्रशासन, भूसंपादन, शासकीय जमिनींचे व्यवस्थापन, ऑनलाइन प्रकरणे, राजस्व अभियान तसेच विविध प्रशासकीय विषयांचे नियोजन अधिक सुसूत्रपणे होणार आहे.
या सुधारणेमुळे महसूल प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास, निर्णयप्रक्रियेला गती मिळण्यास आणि नागरिकांची महसूलविषयक कामे अधिक प्रभावी व वेळेत मार्गी लावण्यास मदत होणार आहे.
#RevenueAdministration #AdministrativeReforms #DistrictAdministration #GoodGovernance #MaharashtraGovernment #


Post a Comment
0 Comments