आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
अकोला:दहा हजार रूपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधकास रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना गुरूवारी घडली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पडलेल्या एसीबीच्या छाप्याने खळबळ माजली आहे.
अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील महसूल विभागात तर भ्रष्टाचाराचा बोलबालाच आहे. अकोला तालुका भुमि अभिलेख कार्यालयातील घोटाळ्याची शाई सोकत नाही तोच स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हा निबंधकाला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह संपूर्ण शासकीय वतुळत खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मुद्रांक जिल्हा निबंधक किरण चौधरी यांना मुद्रांक शुल्काची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा अकोला एमआयडीसी परिसरातील एका भूखंडावरील थकीत मुद्रांक शुल्क निश्चित करून ते भरण्यासाठी तक्रारदाराने संबंधित कार्यालयाच्या अनेक फेऱ्या मारल्या होत्या. यावेळी त्यांना मुद्रांक शुल्काची रक्कम सांगण्यात आली.
मात्र, ही रक्कम कमी करून देण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली. व्यवहार दहा हजारावर ठरला. तेव्हा तक्रारदाराने अकोला लाचलुचपत बंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारी पडताळणी केल्यानंतर एसीबीच पथकाने सापळा रचला.
त्यानुसार किरण चौधऱी यांनी तक्रारदाराकडून १० हज रुपयांची लाच स्वीकारता पथकाने त्यांना पंचासम ताब्यात घेतले. अकोला जिल्हा लाचखोरीच्या प्रकरणात एसीबी या महिन्यात केलेली ही दुसऱी मोठी कारवाई आहे.शासकीय कार्यालयामधी भ्रष्टाचार किती बोकाळला आहे लक्षात येते. बहुतांश लोक तक्रार करत नाही. यामुळे अधिकारी गब्बर झाले आहे.लोकांनी तक्रारी करण्यास पुढे यावे असे आवाहन केले जात आहे.

Post a Comment
0 Comments