राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या बोटांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहनातील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. आमदार सुधीर गाडगीळ हे आपले स्वीय सहाय्यक, अंगरक्षक, फोटोग्राफर आणि वाहनचालक यांच्यासह चारचाकी वाहनातून उगार येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते.
गाडगीळांच्या गाडीसमोर दुचाकी आडवी आली,
तेथून परतत असताना, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अंकलीच्या दिशेने जात असताना 'वडडी आणि कृष्णा घाट' रस्त्यादरम्यान हा अपघात झाला. कृष्णा घाट सर्व्हिस रोडजवळ अचानक एक दुचाकी वाहन आमदार गाडगीळ यांच्या कारसमोर आडवे आले. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची धडक झाली.
एअरबॅग्ज तात्काळ उघडल्या, अनर्थ टळला,
धडक इतकी भीषण होती की कारमधील सुरक्षेसाठी असलेल्या एअरबॅग्ज तात्काळ उघडल्या. त्यामुळे आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला लागलेली किरकोळ दुखापत वगळता मोठा अनर्थ टळला आहे. कारमधील अंगरक्षक नागेश भोकरे, फोटोग्राफर विकास गुंडप आणि चालक गणपती दरेकर हे सर्वजण सुदैवाने सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला असून, त्याला तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अंकलीच्या दिशेने जात असताना 'वडडी आणि कृष्णा घाट' रस्त्यादरम्यान भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचा अपघात झाला.
आमदार सुधीर गाडगीळ यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार,
अपघातानंतर आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना तातडीने दुसऱ्या वाहनातून खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

Post a Comment
0 Comments