राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता राज्यात ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली असून, घडामोडींना वेग आला आहे.
शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाकडे फक्त तीनच खासदार आहेत. तर शिवसेना शिंदे गटातील खासदारांची संख्या वाढून ती 13 वर पोहोचली आहे. दरम्यान खासदार फुटीनंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे, जिथे-जिथे बंडखोरी झाली त्या -त्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन ते सभा घेणार आहेत. एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, या सर्व सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान त्यानंतर आता राज्यात ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू असतानाच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमचे आणि समाजवादी पार्टीचा एकही खासदार फुटणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
खासदार फोडण्यासाठी त्यांना टार्गेट केले जाणार आहे. परंतु आमचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे व समाजवादी पक्षाचे खासदार फुटणार नाहीत. डेलीमिटेशनसाठी भाजपला आणखी 41 खासदारांची गरज आहे, परंतु असे काही होणार नाही. खासदार बजरंग सोनवणे यांनी मुलावर होत असलेल्या आरोपांमुळे फडणवीस यांची भेट घेतली असेल, राज्याचे गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे तर केंद्रातलं गृहमंत्रिपद अमित शहा यांच्याकडे आहे. त्यामुळे सोनवणे फडणवीसांना भेटले असतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी आमदार रोहित पवार हे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आमदार रोहित पवार यांनी राज्यात ऑपरेशन तुतारी वगेरे काहीही होणार नसल्याचं म्हटलं आहे.
शरद पवार गटाकडे किती खासदार?
शरद पवार गटाकडे एकूण 9 खासदार आहेत, त्यापैकी 8 लोकसभेच्या खासदार आहेत, तर एक राज्यसभा खासदार आहे. सुप्रिया सुळे (बारामती), अमोल कोल्हे (शिरूर), धैर्यशील मोहिते-पाटील (माढा), अमर काळे (वर्धा), बजरंग सोनवणे (बीड), निलेश लंके (अहिल्यानगर), भास्कर भग्रे (दिंडोरी) आणि सुरेश म्हात्रे (भिवंडी हे सर्व लोकसभेचे खासदार आहेत, तर शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत.


Post a Comment
0 Comments