आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
व्हेनेझूएला: काल संध्याकाळपर्यंत जिथे मुलांचे हसणे-खेळणे ऐकू येत होते, जिथे संसारातली छोटी-मोठी स्वप्ने सजवली जात होती... तिथे आज फक्त रडण्याचा आवाज आणि ढिगाऱ्यांचे साम्राज्य उरले आहे. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात निसर्गाने असा काही हाहाकार माजवला आहे की पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
२४ जून २०२६ रोजी (बुधवारी) संध्याकाळी केवळ एका मिनिटाच्या अंतराने व्हेनेझुएला देशाला ७.२ आणि ७.५ magnitude तीव्रतेच्या दोन विनाशकारी भूकंपांचे हादरे बसले. गेल्या १०० वर्षातील इतिहासातील तिथला हा सर्वात मोठा आणि भयानक भूकंप मानला जात आहे. अवघ्या काही सेकंदांत हजारो इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या.
अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत १६४ हून अधिक निष्पाप नागरिकांचे मृतदेह सापडले असून १,००० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हजारो इमारती पूर्णपणे जमिनीदोस्त झाल्यामुळे ढिगाऱ्याखाली लाखो लोक अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या (USGS) अंदाजानुसार, मृतांचा आकडा १० हजार ते 1 लाखच्या पार जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देशाची राजधानी कॅराकास (Caracas) येथे सर्वाधिक हानी झाली असून, अल्तामिरा आणि चकाओ सारख्या भागांत २२ मजली इमारतींसह अनेक गगनचुंबी इमारती कोसळल्या आहेत. शहरात वीज आणि फोन नेटवर्क पूर्णपणे ठप्प आहे.
ला ग्वायरा (La Guaira) या शहराला 'आपत्ती क्षेत्र' घोषित करण्यात आले आहे. येथील सर्वात मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ (Simón Bolívar International Airport) पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून सर्व उड्डाणे बंद आहेत.
याशिवाय काराबोबो, अरागुआ, मिरांडा आणि याराकुय या राज्यांमध्येही हजारो घरे आणि इमारती कोसळल्या आहेत. शाळांचे रूपांतर आता तात्पुरत्या छावण्यांमध्ये करण्यात आले आहे.
भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोकांना घराबाहेर पडताना कपडे किंवा चपला घालायलाही जमले नाही, आहे त्या स्थितीत लोकं रस्त्यावर धावले. अनेक लोक धुळीने माखलेल्या रस्त्यांवर आपल्या लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना छातीशी कवटाळून रडताना दिसत आहेत. काही सेकंदांत हजारो कुटुंबं बेघर झाली, तर काहींचा संपूर्ण संसार ढिगाऱ्याखाली गाडला गेला.
निसर्गाने दिलेली ही जखम खूप मोठी आहे, देव त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो!



Post a Comment
0 Comments