Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 'कांच' नदीला पूर, रिसोडला फटका,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

रिसोड: तालुक्यातील कांच नदीला आलेल्या अचानक पुरामुळे नेतंसा-कोयाळी मार्ग काही काळासाठी वाहतुकीस बंद करण्यात आला. या पुराचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसला असून ऐन खरीप पेरणीच्या हंगामात अनेक शेतांतील सुपीक माती वाहून गेल्याने पेरण्या काही दिवस पुढे ढकलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. विशेष बाब म्हणजे, रिसोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला नसतानाही बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांच नदीला पूर आला. वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे नदीने धोकादायक पातळी गाठली आणि नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी शेतजमिनींचे नुकसान झाले असून सुपीक माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पूरामुळे नेतंसा - कोयाळी मार्ग काही काळ बंद ठेवावा लागल्याने नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली असली, तरी शेतांमधील नुकसानीचे चित्र गंभीर असल्याचे दिसून येत आहे.




स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन वर्षांपासून कांच नदीला कांच नदीच्या पुराचा रिसोड तालुक्यात फटका प्रशासकीय अनास्थेवर संताप हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. मागील दोन वर्षांपासून कांचनदीला सातत्याने असे अचानक पूर येत आहेत आणि दरवेळी शेतकऱ्यांनाच याचाफटका सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 'नदीचेखोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात यावे, जेणेकरून पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील' अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे.वारंवार पूर येत असून प्रत्येक वेळी शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा आणि भविष्यातील पूरस्थितीवर नियंत्रण आणावे, अशी त्यांची सातत्याने मागणी आहे.मात्र, प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.


वाहतूक विस्कळीत, नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नदीच्या रौद्ररूपामुळे मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा उपाय म्हणून काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. अचानक रस्ता बंद झाल्याने कामावर जाणारे नागरिक, बाजारासाठी निघालेले शेतकरी आणि शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. अनेक तासगावांचा संपर्क तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.


अद्यापही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी संतप्त झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच नदी खोलीकरणाचा कायमस्वरूपी उपाय हाती घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad