Type Here to Get Search Results !

सेनेच्या वाट्याला आलेलं कॅबिनेट मंत्रिपद श्रीकांत शिंदेंना , राज्यमंत्रिपद विदर्भाला की मराठवाड्याला यावरून शिवसेनेत चर्चा सुरू,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर राज्यमंत्री पदासाठी प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याची माहिती शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 




शिवसेनेच्या वाट्याला आलेलं कॅबिनेट मंत्रिपद श्रीकांत शिंदेला मिळण्याची शक्यता,

ऑपरेशन टायगर'च्या (Opration Tiger) यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला (Shivsena) एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर एक राज्यमंत्रीपद ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या सहा खासदारांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिपदासाठी परभणीचे खासदार संजय उर्फ 'बंडू' जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. संजय जाधव सलग तिसऱ्यांदा परभणीचे खासदार म्हणून निवडणून आले आहेत.


प्रतापराव जाधव यांच्या कामकाजाबद्दल केंद्रात नाराज,

सध्याचे आयुष खात्याचा स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधवांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष खात्याच्या स्वतंत्र प्रभाराबरोबरच आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. प्रतापराव जाधव यांच्या कामकाजाबद्दल केंद्रात नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात प्रतापराव जाधव यांचे मंत्रीपद जाणार की राहणार?, याबद्दल प्रचंड चर्चा सुरु आहे.


श्रीकांत शिंदे आणि ओमराजेंनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन,

 पुढच्या काही दिवसात केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्याआधी खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. दोघांनीही चार किलोमीटर पायी चालत दर्शन घेतलंय. त्यामुळे या दोघांची नावं चर्चेत आहेत. ठाकरेंचे 6 बंडखोर शिवसेनेत सामील झाल्यानं शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 वर गेलीय. यामुळे खासदारांची सर्वाधिक संख्या असणारा शिवसेना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे केंद्रात वाढलेलं वजन वाढल्यानं शिवसेनेच्या पदरातही अधिकचं मंत्रिपद पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad