Type Here to Get Search Results !

आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात भाविक दाम्पत्याला कथित मारहाण; सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. देवीच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी गेलेल्या एका भाविक महिलेने महिला सुरक्षा रक्षकाने तिच्याशी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या पतीलाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.




घटनेचा विडिओ वायरल,

घटनेनंतर संबंधित भाविक दाम्पत्याने आपल्यावर झालेल्या कथित अन्यायाची माहिती देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंदिरासारख्या पवित्र स्थळी, तेही देवीच्या गाभाऱ्यात अशा प्रकारची घटना घडल्याचा दावा समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष,

भाविकांचे म्हणणे आहे की, दर्शनासाठी आलेल्या श्रद्धाळूंशी आदराने व संयमाने वागण्याऐवजी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्यास त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मंदिर प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.


दरम्यान, या कथित मारहाणीसंदर्भातील आरोप संबंधित भाविकांनी केले असून, या प्रकरणावर मंदिर प्रशासन, सुरक्षा यंत्रणा किंवा पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीअंतीच घटनेचे नेमके सत्य स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad