Type Here to Get Search Results !

परभणीचे खासदार मा.संजय जाधव यांचेकडून माउलींच्या चरणी अत्याधुनिक रुग्णवहीका लोकार्पण सोहळा संपन्न,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन नगरी आळंदी येथे अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सर्वांच्या साक्षीने संपन्न झाला. त्यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली ही रुग्णवाहिका वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आली, याचा मनस्वी आनंद आहे.असे संजय जाधव म्हणाले.




माऊलींच्या चरणी आरोग्य सेवेचा संकल्प पूर्ण...

आळंदी हे लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असून वर्षभर येथे भाविकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः वारीच्या काळात आपत्कालीन वैद्यकीय सेवांची गरज अधिक भासते. अशा वेळी ही अत्याधुनिक रुग्णवाहिका गरजू रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देत अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आहे.


खासदार जाधव यांनी मानले आभार,

वारकरी संप्रदायाची सेवा आणि भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी केलेला हा प्रयत्न माऊलींच्या चरणी अर्पण आहे. विकासकामे ही केवळ पायाभूत सुविधांची उभारणी नसून समाजाच्या गरजांशी जोडलेली लोकसेवा असते, याच भावनेतून हा उपक्रम साकारला आहे. या कार्याबद्दल श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी  केलेल्या सन्मानाबद्दल जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.


प्रमुख उपस्थिती..

यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज, ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर बुवा, श्री. राजेंद्र उमाप साहेब, पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळकृष्ण मोरे, श्रीराम गावडे, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, उपनगराध्यक्ष कालिदास तापकीर, नगरसेवक सुरेश नाना झोंबाडे, दीपक काळे, आनंदराव मुंगसे, सविता गावडे, सरपंच वाडेकर, संगीता फपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन गावडे, प्रफुल्ल काका प्रसादे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, तालुकाप्रमुख किरण गवारे, भाजपा अध्यक्ष अमोल विरकर, शहरप्रमुख राहुल चव्हाण, शशी राजे, अजित वडगावकर, सूर्यकांत खुडे सर, अजित वाडेकर, गणेश शेळके, सतीश गुंड, संदीप पगडे, बालाजी शिंदे, माऊली गलबे, श्रीकांत काकडे, संतोष हावडे, देव जोगदंड, जोशी गुरुजी, वासुदेव महाराज, अमोल टेकाळे, सोमनाथ डवरी, निमसे साहेब, चौधरी साहेब तसेच परभणीतील माझे सहकारी शीतल सांखला, संतोष कांबळे, निखिल कुलकर्णी, वेदांत जाधव, बाळासाहेब देशमुख, हनुमंत नांदगाव, प्रवीण लोलगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, महाराज मंडळी, वारकरी बांधव, आळंदीकर ग्रामस्थ व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad