Type Here to Get Search Results !

न्यायालयात बनावट ७/१२ सादर; पोलिस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल, महसूल विभागाच्या फेरचौकशीत उघड झाला प्रकार; पोलिसांकडून फौजदारी कारवाई,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

इंदापूर : बनावट सातबारा उतारा तयार करून तो दिवाणी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केल्याप्रकरणी रेडणी (ता. इंदापूर) येथील पोलिस पाटलाविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या फेरचौकशीत हा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले.




सही शिक्के बनावट असल्याची माहिती,

या प्रकरणातील आरोपीचे नाव महेंद्र लालासाहेब पडळकर असे असून, सध्या तावशी येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रेडणीचे तत्कालीन तलाठी गोरख सुखदेव बारवकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख बारवकर हे जून २०१३ ते जून २०१८ या कालावधीत रेडणी येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. दरम्यान, महेंद्र पडळकर यांनी दिवाणी दावा क्रमांक ११/२०१७ मध्ये गट क्रमांक ७३ / ३ चा ३१ डिसेंबर २०१६ रोजीचा सातबारा उतारा न्यायालयात पुरावा म्हणून सादर केला होता. या उताऱ्यावर संबंधित जमिनीत डाळिंब पिकाची नोंद असल्याचे दर्शविण्यात आले होते. मात्र, महसूल विभागाच्या चौकशीत मूळ अभिलेखांमध्ये त्याच गट क्रमांकाच्या सातबारा उताऱ्यावर ऊस पिकाची नोंद असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या उताऱ्यावरील सही आणि शिक्का हे आपले नसून ते बनावट असल्याचे गोरख बारवकर यांनी नमूद केले.


विविध कलमान्वये गुन्हा,

या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३५९ / २०२६ अन्यये बनावट कागदपत्र तयार करणे, फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागदपत्राचा वापर करणे आणि बनावट कागदपत्र खरे असल्याप्रमाणे वापरणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.


अपील, फेरचौकशी अन् अंतिम निष्कर्ष,

या प्रकरणाची २०२१ पासून विविध स्तरांवर चौकशी करण्यात आली. सुरुवातीला कागदपत्रांच्या अभावामुळे प्रकरण निकाली काढण्यात आले होते. मात्र, संबंधित प्रकरणातील पक्षकार अतुलकुमार अंकुशराव भोसले यांनी न्यायालयातील प्रमाणित प्रत सादर करून नव्याने अर्ज केल्यानंतर चौकशीला गती मिळाली. तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आरोपीने उपविभागीय अधिकारी, बारामती यांच्याकडे अपील केले होते. त्यानंतर झालेल्या फेरचौकशीत बनावट ७/१२ उतारा तयार करून त्याचा न्यायालयीन कामकाजात वापर झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तहसीलदारांनी १९ मे २०२६ रोजी संबंधिताविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गोरख बारवकर यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


नवराष्ट्र मराठी न्यूज,

Post a Comment

0 Comments

Top Post Ad