आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
सोलापूर : झटपट पैसा कमावण्यासाठी सध्या अनेक जण नको ते प्रयत्न करता. शेअर मार्केटमध्ये शेअरवाल्यांचे व्हिडीओ आणि गाड्यांचे फोटो पाहून अनेक जण त्यांच्यासारखे श्रीमंत होण्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. सोलापूरमध्ये एक मुख्याध्यापकाने असाच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. पण, कोट्यवधीचा तोटा झाला. त्यामुळे नैराश्य आल्यामुळे दोन मुलं आणि पत्नीला संपवून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या बार्शी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी पाटील, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात योगेश पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह राहत होते.
1 कोटी 80 लाखांचं झालं कर्ज,
योगेश पाटील हे नंदुरबार इथं जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळेत शिकवता शिकवता त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याची छंद जडला. त्यांनी थोडे थोडे करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत गेले. पण , शेअर मार्केट मध्ये सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांच्यावर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपये कर्ज झालं.
मुलांना आईस्क्रीममधून दिलं विष,
योगेश पाटील यांनी कर्ज कसं फेडायचं, या विवंचनेतून कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पत्नीला आणि दोन निष्पाप चिमुरड्यांना आईस्क्रीममधून अत्यंत जहाल विष दिलं. विष प्राशन केल्यानंतर काही वेळातच तडफडून तिघांचाही मृत्यू झाला. कुटुंबातील सर्वांचा श्वास थांबल्याची खात्री पटल्यावर योगेश पाटील यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. योगेश पाटील यांच्यासह पत्नी आणि मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात ले आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment
0 Comments