Type Here to Get Search Results !

मेट्रोपोलिस पोस्ट छत्रपती संभाजीनगर वेरूळमध्ये पोलिसांच्या मारहाणीत जिल्हा परिषद शिक्षकाचा मृत्यू! दोषींवर कारवाईसाठी हजारो नागरिक उतरले रस्त्यावर,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,



www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

संभाजीनगर: खुलताबाद पोलीस आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केल्यानेच जिल्हा परिषद शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे (वय 54, रा. वेरूळ) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शिक्षकाची पत्नी आणि नातेवाइकांनी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.




वेरूळ लेणी परिसरात बुधवारी (10 जून) रात्री साडेअकराच्या सुमारास एका घराची झाडाझडती घेणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या सोबतच्या व्यक्तींना "तुम्ही कोण आहात? ' अशी केवळ चौकशी केली म्हणून अमानुष मारहाण झाल्याचे समोर येत आहे. या हत्येच्या निषेधार्थ आणि दोषी पोलिसांना निलंबित करून अटकेच्या मागणीसाठी आज, 11 जूनला दुपारी 3 ला वेरूळ येथील भोसले चौकात हजारो नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून 'रास्ता रोको' आंदोलन सुरू केले. सायंकाळी 7 वाजता तब्बल 4 तासांनी हे रास्ता रोको आंदोलन ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. 


Post a Comment

0 Comments

Top Post Ad