आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
धाराशिव: जिल्ह्यातील एका खासदारावर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पाचशे कोटी रुपयांच्या प्लॉट खरेदीपासून ते बनावट खात्यांच्या माध्यमातून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खासदाराने आपल्या वडिलांच्या नावावर मल्टीस्टेट संस्थेमध्ये गरीबांच्या नावाने बनावट खाती उघडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचा दावा केला जात आहे. तसेच, या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित नेत्याविरोधात चौकशीची मागणी जोर धरत आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू झाल्यानंतर संबंधित खासदाराने आपल्या पक्षातून बाहेर पडल्याचीही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment
0 Comments