Type Here to Get Search Results !

विधानसभेतील कर्जमाफीवरील चर्चेदरम्यान मंत्र्यांसह अधिकारी गैरहजर,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

मुंबई:  कर्जमाफीबाबत चर्चा सुरू असताना अधिकारी गॅलरीत सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, तसेच सहकार अथवा कृषिमंत्रीही हजर नव्हते. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. कामकाज रोखून धरले. विशेष म्हणजे सहकार विभागाच्या सचिवांना आणि अधिकाऱ्यांना विधानसभा अध्यक्षांनी हजर राहण्याच्या सूचना देऊनही ते सभागृहात न आल्याने लेखी खुलासा मागवला जाईल व त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा तालिका अध्यक्ष समाधान अवताडे यांनी दिला.




विधानसभेत शेतकरी रांगत आले असते तरी पोहोचले असते.

सहकार सचिवांना ४५ मिनिटांपूर्वी सभागृहात येऊन बसायला सांगितले होते. मंत्रालय ते विधानभवन हे अंतर ४५ मिनिटांचे नसावे. अधिकारी पायी आले तरी ४५ मिनिटे लागत नाहीत. गाडीने ५ मिनिटांत यायला पाहिजे. रांगत आले तरी ३० ते ३२ मिनिटांत इथे यायला पाहिजे.


माझ्या मते, यावर एक समिती बसवून अंतर मोजून घेतले पाहिजे. अध्यक्षांनी आदेश देऊन ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ होऊनही अधिकारी येत नसतील तर प्रश्न विधानभवनाच्या आणि सदस्यांच्या अधिकारांचा असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad