Type Here to Get Search Results !

पत्रकारांना धमकवणाऱ्यांना आता थेट जेलची हवा.! -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

पत्रकारांना धमकी म्हणजे,लोकशाहीला आव्हान..

मुंबई: राज्यात पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे अथवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणान्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा प्रवृत्तीच्या लोकांना थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.




लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हे समाजाचे सजग प्रहरी असून सत्य जनतेसमोर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असतात, त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले किंवा धमक्या या केवळ व्यक्तीवरील हल्ले नसून त्या लोकशाही व्यवस्थेवरील थेट आधात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


" आमची भूमिका दोषींना कोणतीही माफी नाही.मुख्यमंत्र्यांचे ठोस निर्देश,

""पत्रकारांना धमकावणान्यांवर कठोर कारवाई,

" गुन्हे दाखल करून तातडीने अटक करावी,

" प्रकरणांची दुतगतीने सुनावणी करण्याचे आदेश,

" पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी,

" पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा निर्माण,


पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, त्यांना संरक्षण मिळावे आणि दोषींना कोणतीही राजकीय अथवा प्रशासकीय पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही, अशी गवाहीही त्यांनी दिली.

पत्रकार संघटना आणि माध्यम प्रतिनिधींनी या भूमिकेचे स्वागत करत पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत लोकशाहीची ताकद माध्यमांची स्वातंत्र्य!

“माध्यमांचे स्वातंत्र्य हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे." - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Post a Comment

0 Comments

Top Post Ad