आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
लखनऊ: लखनऊमधील अलिगंज भागात झालेल्या भीषण अग्निकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. आता याबाबत एक अत्यंत हृदयद्रावक बाजू समोर आली आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या आदित्य श्रीवास्तव या तरुणाने आपल्या सख्ख्या आईच्या डोळ्यांदेखत अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे श्रीवास्तव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आईच्या डोळ्यादेखत सोडला प्राण,
आदित्यचे मामा रवींद्र श्रीवास्तव यांनी अत्यंत भावूक होत या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आदित्यची आई आपल्या मुलाला भेटण्यासाठी सीतापूर जिल्ह्यातील बिसवा येथून लखनऊला आली होती. ती आपल्या लहान मुलासह आदित्य काम करत असलेल्या इमारतीजवळ पोहोचली, तेव्हा तिथे आधीच भीषण आग लागली होती. इमारतीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी ती माउली तिथे उपस्थित लोकांकडे, प्रशासनाकडे वारंवार विनवणी करत होती, मदतीसाठी ओरडत होती. मात्र, काहीही करून ती आपल्या मुलाला वाचवू शकली नाही. तिच्या डोळ्यांदेखतच आदित्यचा अंत झाला.आदित्य अत्यंत धाडसी स्वभावाचा होता. तो कोणत्याही आव्हानाला घाबरायचा नाही. पण आग आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्याचा असा अंत होईल, असा विचारही कोणी केला नव्हता," अशी प्रतिक्रिया मामा रवींद्र श्रीवास्तव यांनी दिली.
व्यवस्थेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न,
डोळ्यांतील अश्रू पुसत रवींद्र यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, काही दिवस या घटनेची चर्चा होईल, चौकशी आणि कारवाईच्या बाता मारल्या जातील, पण वेळ निघून गेल्यावर लोक हे सर्व विसरून जातील. जोपर्यंत व्यवस्थेत आणि सुरक्षा नियमांमध्ये कोणताही ठोस बदल होत नाही, तोपर्यंत सामान्य लोक अशाच प्रकारे मरत राहतील.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
या भीषण दुर्घटनेचे प्रत्यक्षदर्शी मोहम्मद आसिफ यांनी त्यावेळची थरारक परिस्थिती सांगितली. आसिफच्या म्हणण्यानुसार, अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण इमारत धूर आणि आगीच्या विळख्यात सापडली होती. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी कोणताही सुरक्षित रस्ता उरला नव्हता.आसिफने पुढे सांगितलं की, तो आणि त्याचे सहकारी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काम करत होते. अचानक त्यांच्या सिनीअरने येऊन खाली आग लागल्याची माहिती दिली आणि सर्वांना कॉम्प्युटर सिस्टीम बंद करून बाहेर पडण्यास सांगितले. सुरुवातीला आग एवढी भीषण असेल याचा कोणालाच अंदाज आला नाही.
कॉरिडोअरमध्ये कोंडला धूर,
परंतु, जेव्हा लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संपूर्ण ऑफिसमध्ये काळा धूर पसरला होता. खालून येणाऱ्या आगीच्या ज्वाला वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत होत्या. कॉरिडोअरमध्ये इतका धूर झाला होता की, लोकांना श्वास घेणेही कठीण झाले होते.

Post a Comment
0 Comments