आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
परभणी: मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान संस्थान येथे शनिवारी (दि. 20) दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. मंदिरासमोरील बांधकामाधीन सभागृहाचा पिलर अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
कशी घडली घटना,
दर्शन, कीर्तन व महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. पिलर कोसळताच काही भाविक दिगाम्याखाली अडकल्याची माहिती मिळाली. प्राथमिक माहितीनुसार 50 हून अधिक भाविक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अधिकृत आकडेवारी अद्याप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
भाविकांची गर्दी,
प्रत्येक शनिवारी जिल्हाभरातून हजारो भाविक यशवाडी देवस्थान येथे दर्शनासाठी येतात. आजही मोठया संख्येने भाविक येथे दर्शन, किर्तन आणि महाप्रसादासाठी जमले होते.
■ घटनास्थळी बचावकार्य सुरू असतानाचे दृश्य.
■ घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिंदे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
■ पोलिसांनी परिसराचा ताबा घेत बचावकार्य सुरू केले आहे.
• अनेक अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
■ जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याचे काम सुरू आहे.
■ प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
भाविकांमध्ये भीतीचे वातावरण,
अचानक पिलर कोसळल्याने भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. देवादर्शनासाठी आलेल्या अनेक कुटुंबांवर या घटनेचा मानसिक परिणाम झाला आहे.आतापर्यतची स्थिती अडकलेल्याची शक्यता 50 हून अधिक जखमी.
(प्राथमिक माहितीप्रमाणे) अनेक अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल.
पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित.
मदतीसाठी संपर्क
मानवत पोलीस ठाणे
02439-XXXXX
यशवाडी देवस्थान व्यवस्थापन समिती
प्रशासनाचे आवाहन
9XXXXXXXXX
भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून अधिकृत
माहिती मिळेपर्यंत शांतता राखावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments