navrashtra marathi June 11, 2026
आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
तालुका प्रतिनिधी - शिवाजी औदगे,
मेहकर : मेहकर तालुक्याच्या हद्दीमध्ये उकळी गावालगत साखरकारखाना येत असून सदरच्या कारखान्यामध्ये मुरूम व डब्बर काढून विक्री करण्याचे काम विनपरवानगी चालू आहे. आणि डब्बर काढण्याकरिता ब्लास्ट करणे चालू असते त्या ब्लास्टिंगमुळे रोडने येणाऱ्या -जाणाऱ्या गाडयांना,शेजारी असलेल्या कलाकृती केंद्रवाल्यांना धोका निर्माण झालेला आहेच असे लक्षात आल्यामुळे प्रकरणी उकळी येथील तक्रारकर्ता अमोल श्रीकिसन बोरे यांनी मेहकर येथील मा.तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन मागणी केली होती की,त्वरित स्थळ पंचनामा करून जेसीबी, पोकलँड, ट्रॅक्टर व इतर वाहनांवर आणि वाहन मालकांवर,ड्राइव्हरसहित सरकारी मालमत्ता उत्तखलन कायद्यानुसार पोलीस कार्यवाही सोबत योग्य ती कार्यवाही करावी व योग्य ती शिक्षा व्हावी. असे अमोल बोरे यांनी मागणी केली होती.
प्रतक्षदर्शनी चौकशीत उत्तखलन केल्याचे आढळले,
सदर प्रकरण हे तत्कालीन तहालदार यांनी लक्ष घालून संबंधित मंडळाधिकारी व ग्राममहसूल अधिकारी यांना आहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.उपरोक्त संदर्भीय विषयानुसार संबंधितास नोटीस देण्यात आली मौजे उकळी येथील साखरखण्यात विनापरवानगी मुरुम व डब्बर ब्लास्टींगमुळे गावातील नागरीकांना व रोडवरील गाड्यांना व शेजारी असलेले कलामुर्ती केंद्रावाल्याना धोका निर्माण झालेला आहे. तरी सदर घटनास्थळी जावुन सबंधीत व्यक्तीवर व जेसीबी, पोकलँड, ट्रॅक्टर यांच्यावर योग्य़ ती कार्यवाही करावी. व सबंधीत वाहनावर व अवैध उत्खनन करणा-यावर पोलीस कार्यवाही व्हावी. त्यानुसार मंडळ अधिकारी / ग्राम महसुल अधिकारी यांचा अहवाल मागविण्यात आला असुन सदर अहवालात मौजे उकळी गट नं. 23 व 24 मध्ये ब्लॉस्टींग केल्याचे दिसुन आले व तेथील निघालेले डब्बर अंदाजे 350 ब्रास कारखाण्याजवळच्याच जागेत गट नं. 45, 46 मध्ये एकत्रीक केलेले आहे.असा चौकशी अंती असा अहवाल प्राप्त झाला आहे.
हजर राहण्याचे आदेश,
तरी सदर गौण खनिज वापराबाबत आपण आपल्याकडील परवानगी, रॉयल्टीची प्रत घेवुन आपले म्हणणे मांडण्यासाठी दिनांक 16/06/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता या कार्यालयास हजर रहावे. आपण हजर न राहिल्यास आपले काहीच म्हणणे नाही. असे गृहीत धरुन एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल.ग्राममहसुल अधिकारी उकळी ता. मेहकर सदरची नोटीस बजावून पोच या कार्यालयास सादर करावी.असे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत.
Post a Comment
0 Comments