Type Here to Get Search Results !

बुलढाण्याच्या पीडब्ल्यूडी'मध्ये दिव्यांग लिपिकाकडे चक्क पाच टेबलचे कामकाज ! पुरेसे कर्मचारी असताना एकालाच काम,काय म्हणायचं? कार्यकारी अभियंत्याचा प्रताप कि,

आंरतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक :


बुलढाणा: येथील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काही मलिदा मिळणाऱ्या टेबलवर अधिकाऱ्यांच्या संगनमताने मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नेमणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे कार्यालयात पुरेसे कर्मचारी उपलब्ध असतानादेखील विशेष मेहरबान असलेल्या एका दिव्यांग लिपिकाकडे चक्क पाच टेबलची जबाबदारी सोपवून कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांनी इतर कर्मचाऱ्यांसोबत दुजाभाव केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली.




गेल्या बारा वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयामध्ये हा लिपिक एकाच ठिकाणी ठाण मांडून बसला असून, दिव्यांग असतानादेखील पाच-पाच टेबलचे कामकाज सांभाळतो तरी कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग काही ना काही कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो.


रस्त्यांची दुर्दशा याविषयीच्या शेकडोंच्या संख्येने तक्रारी प्राप्त होतात. याशिवाय अंतर्गत कर्मचाऱ्यांविषयी देखील नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात. त्या गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचा आरोप सामान्य नागरिकांकडून केला जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, त्या लिपिकाकडे नियमबाह्य पद्धतीने लेखापरीक्षण, अर्थलिपिक, निविदा लिपिक, भाडे लिपिक एकाचवेळी म विभाग बांधकाम लेखा, अर्थ, निविदा, भाडे, कंत्राटदार नोंदणीसारखे महत्वाचे टेबल देण्यात आले आहे.


'डीएससी'चा बाहेरील संगणकावर वापर,

निविदा प्रक्रिया व कंत्राटदार नोंदणी प्रक्रिया कार्यालयाऐवजी खासगी संगणक केंद्रांवर केल्याची आणखी एक धक्कादायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डीएससी (डिजिटल सिग्नीचर) चा वापर संगणक केंद्र चालकाच्या माध्यमातून केला जात असल्याची माहितीसुद्धा हाती आली. यामुळे संपूर्ण नोंदणी व निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आणि कंत्राटदार नोंदणीसारखे महत्त्वाचे टेबल देण्यात आले आहेत. हे टेबल देण्यामागे काहीतरी गूढ असल्यासारखं वाटत आहे.


कार्यभारच नाही; तीन कर्मचाऱ्यांना फुकटचे वेतन,

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यरत असलेले तीन लिपिक असे आहेत की, ते सद्यस्थितीत फुकटचा पगार लाटत आहेत. त्यांच्याकडे कुठल्याच टेबलचा कार्यभार देण्यात आला नसल्यामुळे आम्ही काम तरी कोणते करावे, असा सवाल करीत हे कर्मचारी फिरतात. एका कर्मचाऱ्याकडे गेल्या आठ महिन्यांपासून, दुसऱ्याकडे पाच महिने तर तिसऱ्या कर्मचाऱ्याकडे दोन महिने झाले कार्यभार देण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. ही चूक त्या कर्मचाऱ्यांची नसून तेथील मर्जी राखणाऱ्या व्यवस्थापनाची आहे. दिव्यांग कर्मचाऱ्याकडे पाच पाच टेबल आहेत, पण या तीन कर्मचाऱ्यांसाठी त्यातील एकेक टेबल का दिला जात नाही, याबद्दल अन्य कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य आहे, तर कार्यभार नसलेले कर्मचारी रोष व्यक्त करीत आहेत.



सोईच्या जागा आधीच फिक्स,

सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बदल्यांचा हंगाम सुरू झाला आहे. बदलीपात्रांची यादी तयार झाली असून, वरिष्ठांची स्वाक्षरीही झाल्याची माहिती आहे. यामध्ये सोयीनुसार आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना बसविल्याचेदेखील सांगितले जात आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad