आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक :
जालना : निराधार लाभार्थ्यांना हयातीचे दाखले सादर करण्यासाठी होणारी हेळसांड लक्षात घेऊन आधार आधारित डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता निराधारांना 'बेनिफिशियरीॲप'द्वारे स्वतःचा सत्यापन घरबसल्या हयातीचा दाखला उपलब्ध होणार आहे.लाभार्थ्यांची संख्या सुमारे ५० लाखांवर आहे. त्यांना आधार आधारित डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 'बेनिफिशियरी सत्यापन ॲप'चा उपयोग होणार आहे.
राज्य सरकारने ७ मे २०२६ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनालाख ४० हजार ९६२,तर राज्यात ५० लाखावर लाभार्थी.
गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तीवेतन योजना, त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन अशा विविध योजना सामाजिक विशेष सहाय्यातून राबवल्या जातात.
"बेनिफिशियरी सत्यापन तालुकानिहाय लाभार्थी,
अॅप'द्वारे डिजिटल हयात प्रमाणपत्र ग्राह्य,
जिल्ह्यातील निराधार आणि वृद्ध लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आता कार्यालयांत चकरा मारण्याची गरज नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून लाभार्थ्यांचे जीवन सुसहा करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. 'बेनिफिशियरी सत्यापन अॅपमुळे पारदर्शकता वाढेल आणि कोणाचेही अनुदान केवळ दाखल्याअभावी थांबणार नाही.
आधार आधारित हयातीचा दाखला सेतू आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत स्तरावरील संग्राम केंद्रावर 'बायोमेट्रिक' किंवा फेस आयडेंटिफिकेशन' सुविधा उपलब्ध करून लाभार्थ्याचे हयात प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार आहे तसेच लाभार्थ्यांनी स्वतः 'बेनिफिशियरी सत्यापन अॅप'द्वारे डाऊनलोड केलेले प्रमाणपत्रही ग्राह्य मानले जाणार आहे.
असे करा घरबसल्या प्रमाणपत्र सादर.
मोबाइलमध्ये बीएसए अॅप डाऊनलोड करा. नंतर आधार क्रमांक व आवश्यक माहिती भरा. कॅमेरा समोर धरून चेहरा स्कॅन करावा. यशस्वी प्रमाणीकरणानंतर डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर होईल.
नवराष्ट्र मराठी न्यूज,
Post a Comment
0 Comments