आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक :
पॅसिफिक महासागरात एक मोठे नैसर्गिक संकट आकाराला येत असून शास्त्रज्ञांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नोव्हेंबर २०२६ पर्यंत पॅसिफिक महासागरामध्ये सुपर एल निनो पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आत शंभर टक्के सांगितली जात आहे. हवामान बदलाच्या संपूर्ण इतिहासामध्ये आजवर केवळ चार वेळा अशा प्रकारचा तीव्र सुपर एल निनो पाहायला मिळाला आहे. आता येणारा हा पाचवा आणि कदाचित गेल्या १५० वर्षांतील सर्वात शक्तिशाली सुपर एल निनो ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे या जागतिक संकटाचा प्रभाव पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पडणार आहे.
सामान्यतः एल निनोच्या काळात पॅसिफिक महासागराचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते. परंतु सुपर एल निनोच्या स्थितीत समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते. तापमानात झालेली ही किरकोळ वाटणारी वाढ संपूर्ण पृथ्वीवरील हवेच्या प्रवाहांची दिशा बदलण्यासाठी पुरेशी ठरते. हवेचे हे प्रवाह बदलल्यामुळे आपण पाहत असलेले नेहमीचे हवामान पूर्णपणे विस्कळीत होते. या बदलांमुळे जगातील काही भागांमध्ये अत्यंत भीषण दुष्काळ पडेल, तर काही भागांमध्ये विक्रमी पाऊस पडून पूर येईल. अटलांटिक महासागरातील वादळांचा वेग मंदावेल, मात्र दुसरीकडे पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळे अत्यंत रौद्र रूप धारण करतील.
या परिस्थितीमुळे जागतिक तापमानात कमालीची वाढ होणार आहे. शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, या उष्णतेमुळे पॅरिस करारात ठरवून दिलेली १.५ अंश सेल्सिअसची जागतिक तापमान वाढीची मर्यादा तात्पुरत्या काळासाठी ओलांडली जाऊ शकते. यापूर्वी १८७७ मध्ये पॅसिफिक महासागर इतक्या वेगाने तापला होता, जो इतिहासातील सर्वात शक्तिशाली एल निनो मानला जातो. या वर्षी पुन्हा एकदा त्याच सर्व धोक्याच्या घंटा वाजू लागल्या आहेत. आधीच कमालीचे तापमान वाढलेल्या या जगात सुपर एल निनोचा सामना करणारी आपली ही पहिलीच पिढी ठरू शकते, त्यामुळे या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी जग किती तयार आहे हाच आता मोठा प्रश्न आहे.
सुपर एल निनोचा भारताच्या पावसाळ्यावर म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर (Southwest Monsoon) अतिशय गंभीर आणि थेट परिणाम होतो. पॅसिफिक महासागरामध्ये होणारे हे बदल भारतापासून हजारो किलोमीटर दूर असले, तरी ते भारतातील मान्सूनचे चक्र पूर्णपणे विस्कळीत करू शकतात. एल निनोचा भारतीय हवामानावरील प्रभाव आपण पुढील काही भागात समजून घ्यायचा प्रयत्न करूया.
नवराष्ट्र मराठी न्यूज,

Post a Comment
0 Comments