आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
रायपूर येथील घटना,
मेहकर : पोटच्या मुलाने आपल्या स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचून वडिलांकडे ४० तोळे सोन्याची खंडणी मागणाऱ्या मुलाचा प्रताप मेहकर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला आहे. आर्थिक अडचण दूर करण्यासाठी एका मित्राच्या मदतीने हा सर्व ‘ड्रामा' रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोखरी फाट्याहून घेतलं पोलासांनी त्याब्यात,
रायपूर ता.मेहकर येथील जनार्दन काळे यांचा १९ वर्षीय मुलगा चेतन काळे हा बी.एस्सी. ची परीक्षा देण्यासाठी कॉलेजला गेला होता. मात्र, सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. दरम्यान, जनार्दन काळे यांना चेतनच्याच मोबाईलवरून दुपारी १वाजताच्या सुमारास एक व्हिडिओ आणि मेसेज आला. त्या व्हिडिओमध्ये चेतनला बांधून ठेवल्याचे दाखवल्या गेले. “तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, त्याला जिवंत पाहायचे असेल तर २ तासांत ४० तोळे सोने घेऊन एकट्याने शेगाव रेल्वे स्टेशनवर या,” अशी धमकी अज्ञात इसमाने दिली होती. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नाशिक ग्रामीणमधील लासलगाव परिसरातून चेतन काळे आणि त्याचा मित्र विवेक सखाराम काकडे (वय २६ वर्ष, रा.पोखरी फाटा)यांना ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास सुरु,
पोलिसांनी दोघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. बऱ्याच दिवसांपासून असलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्यांनी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला होता. वडिलांकडून मोठी रक्कम किंवा सोने उकळण्यासाठी त्यांनी हा कट आखला होता. या प्रकरणात आणखी काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पुढील तपास सपोनी अशोक अवचार करत आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्र फिरली,
ही कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणीक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, आणि पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप बिराजे, सपोनी अशोक अवचार, पोउपनि किरण खाडे, संदीप मेंधणे, सुखदेव गव्हाणे, लक्ष्मण कटक, दिगंबर चव्हाण, विजय बेडवाल, मोहम्मद परसुवाले, केशव अवचार आणि विठ्ठल पैठणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment
0 Comments