Type Here to Get Search Results !

पंपावर डिझल नाही मिळत शेतकऱ्यांना,म्हणे तहसीलदारांचे आदेश,

 आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net



तालुका प्रतिनिधी - शिवाजी औदगे,

मेहकर : मेहकर ते सोनाटी रोडलगत उकळी शिवारात "नायरा "कंपनीचा पेट्रोलपम्प असून शेतकऱ्यांच्या शेतीकामांसाठी लागणारे डिझल जेसीबी व ट्रॅक्टर चालक यांना कॅनमध्ये देण्यास पंपचालकाने साफ नकार दिला आहे.


सरपंचांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन पंपचालकाला जाब विचारला,

 उकळी - सुकळी गट ग्रामपंचायत चे सरपंच मा. नितीन नवले पाटिल यांना भेटून पंपचालकाची तक्रार केली असता मा.सरपंच नवले व परिसरातील काही शेतकरी पम्प मालकाला जबाब विचारण्यासाठी गेले होते.शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझल का देत नाही अशी विचारणा केली असता पंपचालक,मालक राहुलभाऊ वानखेडे यांनी सांगितले की,तहसीलदार साहेबांनी आदेश दिले आहेत कॅनमध्ये डिझल देउ नका असे. त्यामुळे आम्ही कॅनमध्ये डिझल देणे बंद केलेले आहे.लोकांना कॅनमध्ये डिझल लागत असेल तर सर्वांनी तहसीलदार यांना भेटून डिझल देण्याचे आदेश देण्याची मागणी करावी आमचा काही दोष नाही.


प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज,

शेतकऱ्यांची शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात झाली असून ट्रॅक्टर, जेसीबी ची कामे आत्यावशक असतांना आणि प्रत्येक वेळी शेतातून जेसीबी व ट्रॅक्टर पंपावर आनने शक्य नाही.कारण चालू कामातून जर ट्रॅक्टर,जेसीबी पंपावर आणले तर शेतीकामासाठी शेतकऱ्यांना मशागतीसाठी लागणारे भाडे चालक वाढावतील आणि ते शेतकऱ्यांना न परवडणारे राहिल.आधीच महागाईने कळस गाठला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन पम्पचलकांना त्वरित आदेश देऊन कॅनमध्ये डिझल देण्याचे सहकार्य करावे जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्यांना शेतीच्या माशातगती साठी त्रास होणार नाही.व खर्च वाढणार नाही याची काळजी घावी अशी सर्व शेतकरी वर्गाची नजर सध्या प्रशासनाकडे लागून आहे.हीच अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad