आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
जिल्हाप्रतिनिधी - समाधान राठोड,
गोरसेनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून इशारा!
सिंदखेडाराजा : महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (ST) समावेश करण्याच्या मागणीसाठी स्थापन करण्यात आलेली सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल.तहलियानी समिती तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी, या मागणीसाठी 'गोरसेना' आक्रमक झाली आहे.येत्या सात दिवसांत या समितीच्या कामकाजाबाबत स्पष्टता न मिळाल्यास राज्यभर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
काय आहे प्रकरण ?
बंजारा समाजाची राहणीमान,बोलीभाषा, संस्कृती आणि मागासलेपण हे आदिम सभ्यतेचे सर्व निकष पूर्ण करतात.या आधारावर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे,यासाठी २०२५ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ५८ महामोर्चे काढण्यात आले होते.या आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी बैठक घेतली आणि ११ डिसेंबर २०२५ रोजी निवृत्त न्यायाधीश एम.एल.तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय अभ्यास समितीची घोषणा केली होती.
पाच महिन्यांपासून समितीचे काम रखडल्याचा आरोप,
या समितीमध्ये मानववंशशास्त्रज्ञ,समाजशास्त्रज्ञ आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश आहे.मात्र,समिती स्थापन होऊन पाच महिने उलटले तरी या समितीने नेमके काय संशोधन केले किंवा काय नोंदी घेतल्या,याबाबत समाज अद्याप अनभिज्ञ आहे.समितीने आपला अभ्यासपूर्ण आराखडा अद्याप समाजासमोर मांडलेला नाही,असे निवेदनात म्हटले आहे.
सात दिवसांचा अल्टिमेटम,
गोरसेनेने या निवेदनाद्वारे सरकारला सात दिवसांची मुदत दिली आहे.या कालावधीत समितीच्या संशोधनाबाबत आणि प्रगतीबाबत अवगत करावे,अन्यथा बंजारा समाजाची दिशाभूल होत असल्याचे समजून भविष्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,असा इशारा प्रा.संदेश चव्हाण यांनी दिला आहे.हे निवेदन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांसह इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनाही पाठवण्यात आले आहे.या निवेदनावर रोहिदास राठोड,डॉ.विजय राठोड,रमेश राठोड,विलास राठोड,भाऊ महाराज,शाम जाधव(प.स.सभापती),लक्ष्मण राठोड,विठ्ठल पवार,संतोष आढेव,कृष्णा आढे,शाम चव्हाण,कृष्णा चव्हाण ईतर अनेक कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी केली आहे.

Post a Comment
0 Comments