आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील,
– कंडारीसह परिसरात शोककळा;
सिंदखेडराजा: साखरखेर्डा-शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कलमधील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि कंडारीचे माजी सरपंच शिवाजी माधवराव कायंदे (वय ५७) यांचे रविवारी (ता.३ मे) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.सामान्यजनतेच्या प्रश्नांसाठी सतत प्रशासनाशी झुंज देणाऱ्या या नेतृत्वाच्या अचानक जाण्यामुळे कंडारीसह परिसराततील सर्व गावांवर शोककळा पसरली आहे.
जनसामान्याच्या सोईसाठी अहोरात्र दिला लढा,
शिवाजीराव कायंदे हे माजी जिल्हा परिषद सदस्य बद्रीभाऊ वाघ यांचे भाचे होते.आणि परिसरात परिचित होते. नेहमी हसतमुख असणारा चेहरा.सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासाचा ध्यास मनावर घेतला होता. विशेषतः शेंदुर्जन-जागदरी-कंडारी-भंडारी-खळेगाव या रस्त्यासाठी त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एसटी बस सुरू व्हावी, यासाठी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे वारंवार मागणी केली होती.शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला होता.

Post a Comment
0 Comments