आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -
खोटा मुखवटा घालून समाजात फिरणारे आज गप्प का आहेत?आता कुठे आहेत नारीशक्तीचा गाजावाजा करणारे?छत्रपती शिवाजी महाराजानीहिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि त्याच स्वराज्याच्या भूमीत एका चिमुकल्या लेकीवर अत्याचार होतो!आणि तिचा जीव घेतला जातो! ही केवळ घटना नाही, तर महाराष्ट्राच्या मस्तकावरची काळी छाया आहे.
कोणतं हे शासन, कोणती व्यवस्था?त्या निरपराध लेकीसाठी महिला रस्त्यावर उतरतात, न्याय मागतात… आणि त्यांच्यावरच लाठीमार होतो? वा... रे सरकार.आज प्रश्न एका लेकीचा नाही… प्रश्न आहे आपल्या संवेदनांचा, आपल्या जिवंतपणाचा.जर अन्याय पाहूनही आपण शांत बसलो, तर आपण जिवंत का आहोत? की आपण फक्त चालती-बोलती प्रेत आहोत?
जर आज राजे छत्रपती असते, तर अन्याय करणाऱ्यांना कधीच माफी नसती!आता वेळ आली आहे आवाज उठवण्याची, अन्यायाविरोधात! उभं राहण्याची न्यायासाठी!

Post a Comment
0 Comments