Type Here to Get Search Results !

पुणे पोलीस दलात खळबळ, पोलीस आयुक्तालयाच्या आवारातच लाचेची डील,


आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,

नवराष्ट्र मराठीन्यूज,

www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक - 




पुणे - पुण्याच्या पोलीस दलाच्या गोटातून एक अतिशय
खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्या ठिकाणी कायद्याचे रक्षण होणे अपेक्षित असते, त्याच पोलिस आयुक्तालयाच्या आवारात लाचेचा मोठी 'डील' सुरू असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केला आहे.


वैशाली तोटेवार यांना तब्बल २८ लाखाची लाच घेतांना अटक,


आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वैशाली तोटेवार यांची नुकतीच मुंबई येथील लोहमार्ग विभागात बदली झाली होती. त्यांना पुणे शहर पोलीस दलातून कार्यमुक्त देखील करण्यात आले होते.बदली होऊनही पुण्यातील फाईल्सचा मोह त्यांना आवरता आला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलिस
आयुक्तालयासारख्या संवेदनशील ठिकाणी इतकी मोठी
रक्कम स्वीकारण्याची हिंमत त्यांनी दाखवल्याने एसीबीचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.



अबब... तब्बल २८ लाखाची लाच,


आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांनी नेमक्या कोणत्या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी ही २८ लाखांची अवाढव्य रक्कम मागितली होती, याचा तपास आता एसीबी करत आहे. ही लाच तोटेवार स्वतःसाठी घेत होत्या की यात अजून कोणा मोठ्याचा वरदहस्त आहे, याबाबत शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.


प्रकरणाचा तपास सुरू,

मिळल्या माहितीनुसार, एसीबीने सापळा रचला आणि तोटेवार यांना २८ लाखांच्या रकमेसह जाळ्यात ओढले. सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या मालमत्तेची आणि मागील काही काळातील संशयास्पद व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments