Type Here to Get Search Results !

जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालयाचा तीन ही शाखांचा निकाल १०० टक्के,

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,

www.navrashtramarathi.in.net


जिल्हाप्रतिनिधी -समाधान राठोड

सिंदखेडाराजा - राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मभूमी असलेल्या सिंदखेडरजा तालुक्यातील आज (HSC) बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालय दुसरबीड च्या एमसीव्हिसी, विज्ञान, व कला या तिन्ही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून निकालाची परंपरा कायम राखली आहे. 



जीवनविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यायाची ओळख,

सातत्यपूर्ण शिक्षण प्रणाली, व्यक्तिगत स्तरावर विद्यार्थ्यांकडे असणारा लक्ष, शाळा महाविद्यालयाला विविध तज्ञ लोकांच्या भेटी, या अगोदर शिकून गेलेल्या आणि नंतर अधिकारी बनलेल्या विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष शाळा महाविद्यालयात बोलावून मार्गदर्शन आणि तज्ञ तथा आपल्या विषयामध्ये पारंगत असणारा प्राध्यापक वर्ग आणि त्याचमुळे कशाचाही भरोशावर न राहता फक्त शिकवणीच्या भरवशावर आलेला निकाल हीच जीवन विकास विद्यालयाची व कनिष्ठ महाविद्यालयाची ओळख आहे. 


उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी वर्गाचं मनःपूर्वक अभिनंदन!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता.कार्याध्यक्ष सिंदखेडाराजा विनायक पाटील भानुसे जिल्हापरिषद सर्कल किनगावराजा यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.



Post a Comment

0 Comments