Type Here to Get Search Results !

अजितदादांच्या अत्यंत जवळच्या नेत्याचं निधन, पहाटे आला ह्रदयविकाराचा झटका,

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,

नवराष्ट्र मराठी न्यूज,

www.navrashtramarathi.in.net





मुख्यसंपादक - 

अजितदादांच्या अत्यंत जवळच्या नेत्याचं निधन, पहाटे आला ह्रदयविकाराचा झटका

परतूरचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे निष्ठावान नेते सुरेशकुमार जेठलिया यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. २००९ साली परतूर मतदारसंघाचे नेतृत्व केलेल्या जेठलियांच्या निधनामुळे जालना जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. या दुःखद घटनेने परतूर-मंठा परिसरात शोककळा पसरली आहे.


दोनवेळा केल होत परतूर मतदारसंघाचे नेतृत्व,

दिवंगत माजी आमदार जेथलिया यांनी दोन वेळा परतूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं. ते आमदार असताना, त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील अनेक विकासकामं त्यांनी केली. जेथलिया यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्येही ते अत्यंत लोकप्रिय होते. दिवंगत नेते अजित पवार यांच्याही ते जवळचे होते. जेथलिया यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.


महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच आली धक्कादायक बातमी,

महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच, शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक धक्कादायक बातमी आली आहे. दोन वेळा आमदारकी गाजवलेले, अजित पवार यांचे निकटचे असलेल्या शिलेदाराचं निधन झालं आहे. जालना जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठा चेहरा आणि परतूरचे माजी आमदार सुरशेकुमार जेथलिया यांचं आज पहाटे निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जेथलिया यांनी अखेरचा श्वास घेतला. जेथलिया हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि अजित पवार यांचे विश्वासू, म्हणून त्यांची ओळख होती. त्याच्या अकस्मात निधनाने सर्वांनाचा मोठा धक्का बसला असून जिल्हयात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.



Post a Comment

0 Comments