आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
जिल्हाप्रतिनिधी- समाधान राठोड,
लोणार - खापरखेड लाड ता लोणार. येथील रेती घाटाबाबत जिल्हाधिकार्यालय बुलढाणा खनिज कर्म शाखा यांच्या आदेश जावक क्र. कवी, कक्ष, खनि. अ मा 1/433/2025दि.5/12/2025 अन्वये 50 पेक्षा जास्त टी-शर्ट घालून दिले आहेत परंतु ठेकेदार व महसूल अधिकारी संगमने मुद्दा क्र.10.13.15.17.18.19.21.22.23.25.32.34.35.37.39.40.46.49.51.57.58.59. अशा एकूण 25 मुद्द्यांचे सर्रास उल्लंघन करीत आहे.
गजानन रामराव आडे रा. सावरगाव तेली यांनी दिनांक १७/०४/२०२६ रोजीच आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.त्या अनुषंगाने त्यांनी उपोषण १ मे २०२६ पासून खापरखेड लाड येथे रेती घाटावर सुरू केले आहे.आदेशाची अवहेलना कशी झाली पुढील मुद्या नुसार सांगितले.
निवेदनातील ठळक मुद्दे -
१. मुद्दा क्र.10 भंग वाहनांची क्षमता प्रकार तपशील खनिज प्रणालीवर नोंदविणे बंधनकारक पण सर्रास नियमबाह्य वाहतूक सुरू आहे परंतु अधिकारी यांचे दुर्लक्ष.
२. २५ अटींचा भंग जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशातील 25 मुद्द्यांचे पालन न करता अवहेलना केली जात आहे व संबंधित अधिकारी पदाचा दुरुपयोग करीत आहे संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकारी सुकृत प्रथमदर्शनी दोषी आहेत.
३. R T I ला केराची टोपली दाखवली. माहिती अधिकारात माहिती मागितली तरी कालमर्यादित माहिती दिली जात नाही.उपोषण कर्ते गजानन रामराव आडे यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहील व काही जीवित आणि झाल्यास याला जबाबदार प्रशासन राहिल असे आडे यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments