Type Here to Get Search Results !

पेट्रोल- डिझेलचा अतिरिक्त पुरवठा होणार ॥ सरकारकडून मिळाले आश्वासन!!

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


ता. प्रतिनिधी : शिवाजी औदगे,

मेहकर - लोणार मतदारसंघात पेट्रोल- डिझेलची निर्माण झालेली अभूतपूर्व मागणी व टंचाई परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आज मा आमदार सिद्धार्थ खरात यांनी थेट मंत्रालय गाठून मा. छगन भुजबळ, मंत्री अन्न व नागरी पुरवठा, श्री राजेश अग्रवाल , मुख सचिव, महाराष्ट्र राज्य , श्री अनिल डिग्गीकर , अप्पर मुख्य सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय यांची भेट धेतली.तसेच चंद्रकांत डांगे रेशनिंग आयुक्त, महाराष्ट्र राज्य तसेच विहीर जोशी महाराष्ट्र राज्य समन्वयक, पेट्रोलियम व नॅचरल गॅस व इतर सर्व संबंधित तेल कंपनी प्रतिनिधी यांची मंत्रालयात भेट घेतली. 




मेहकर मतदार संघासह बुलढाणा जिल्हा व लगतच्या वाशिम , अकोला व जालना जिल्ह्यात पेट्रोल- डिझेल ची अभूतपूर्व मागणी व त्यामुळे निर्माण झालेली टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली .


मा. पंतप्रधान महोदयांच्या इंधन वापराबद्दल केलेल्या आवाहनानंतर जिल्ह्यात व विशेषतः माझ्या मतदारसंघातील दोन्ही तालुक्यात डिझेलची प्रचंड प्रमाणात मागणी वाढली असून पेट्रोल पंप धारकांच्या डिझेल आयात व विक्रीमध्ये वाढ होऊनही वाहनधारकांच्या प्रचंड रांगा पेट्रोल पंपासमोर लागल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची बाब उपरोक्त प्रमाणे मा. मंत्री महोदय व मुख्य सचिव व अप्पर मुख्य यांच्या निदर्शनास सिद्धार्थ खरात यांनी आणून  दिली.


 महत्वाची बाब म्हणजे खरीप हंगाम सुरू होत असून शेतीची कामे करण्यासाठी शेतकरी नांगरणी , वखरणी, रोटा करणे, शेतदुरूस्ती, व शेतीशी संबंधित कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करावा लागत असल्याने व सद्यस्थितीत पेट्रोपंपावर कॅनद्वारे डिझेल देण्यावर निर्बंध असल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने शेतीची कामे खोळंबल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाल्याने खरीप हंगामासाठी शेतक-यांना पेट्रोल पंपावर कॅनद्वारे डिझेल पुरवठा करण्यात यावा अशी मागणी खरात यांनी केली. व असा डिझेल पुरवठा करतांना ट्रॅक्टर साठी आरसी बुक अथवा फार्मर आयडी घेऊन व ठरावीक पेट्रोल पंप निर्धारित करून किमान २० -३० लीटर डिझेल कॅन मध्ये देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात याव्यात अशीही मागणी त्यांनी केली..


खरात यांच्या मागण्यांचा सन्मानिय मंत्री महोदय, मा. मुख्य सचिव , तसेच अप्पर मुख्य सचिव यांनी अतिशय सकारात्मक दखल घेऊन आयुक्त रेशनिंग यांना तात्काळ सूचना दिल्या व श्री चंद्रकांत डांगे आयुक्त, रेशनिंग यांनी देखील तात्काळ संबंधित पेट्रोल व डिझेल कंपन्याच्या प्रतिनिधी यांची बैठक घेऊन पेट्रोल व डिझेल चा अतिरिक्त पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या..


तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देखील मागणी केल्या प्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सुचना दिल्या..त्यामुळे छगन भुजबळ, मा. मंत्री, अन्न व नागरी पुरवठा , मा. राजेश अग्रवाल , मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्य, श्री अनिल डिग्गीकर , अप्पर मुख्य सचिव, व चंद्रकांत डांगे , आयुक्त, रेशनिंग यांचे सिद्धार्थ खरात यांनी मन: आभार मानले.


आज मै उपर आसमां निचें..॥ शेतक-यांची चिंता करू नये !! 

शेतक-यांना ट्रॅक्टर द्वारे शेतीकामासाठी आवश्यक तेवढे डिझेल मिळणार !




Post a Comment

0 Comments

Top Post Ad