Type Here to Get Search Results !

पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी 30 हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत खात्याच्या जाळ्यात,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक : देविदास वायाळ,

 

पनवेल :  पनवेल गावदेवीपाडा येथील 4.22 गुंठे जमिनीचे सातबार्‍यावर नावाची नोंद मंजूर करण्याकरिता पनवेल तहसील कार्यालयात कार्यरत असणारे मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांनी फिर्यादीकडे 50 हजाराची लाच मागितली होती. त्यातील 30 हजार रुपयाची लाच स्वीकारताना अलिबाग रायगड लाच लुचपत पथकाने सायंकाळी रंगेहाथ पकडले.




फिर्यादी यांच्याकडे पनवेल तहसील कार्यालयात कार्यरत असणारे मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांनी त्यांचे काम करण्याकरिता स्वतःकरिता 20 हजार रुपये तसेच थंब अ‍ॅप्रुव्ह करून घेणार्‍या कर्मचार्‍यांसाठी 10 हजार रुपये असे एकूण 30 हजार रुपयाची मागणी केली होती. सदर रक्कम आज सायंकाळी पंचमुखी हनुमान शेजारी मिठास स्वीटस् समोर स्वीकारत असताना सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्रचे शिवराज पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्रचे भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड अलिबाग पोलीस उपअधिक्षक श्रीमती.सरिता भोसले यांच्या विशेष पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून गोवर्धन माने यांना रोख रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad