Type Here to Get Search Results !

चंद्रपूरच्या जुनोना ( फूलझरी) परिसरात वाघाची दहशत; गाईची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीती!

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net




मुख्यसंपादक -

 चंद्रपूरच्या जुनोना ( फूलझरी) परिसरात वाघाची दहशत; गाईची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीती!


​चंद्रपूर: व्याघ्र राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात मानवी वस्तीजवळ वाघांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोशल मिडीयाच्या प्राप्त माहीतीनुसार ताज्या घटनेत, ५ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास मूल तालुक्यात येत असलेल्या फूलझरी गावाजवळील शेत परिसरात वाघाने एका गाईवर हल्ला करून तिची शिकार केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे .




​या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून, वाघ थेट वस्तीजवळ आल्याने शेतकरी आणि गुराख्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने या भागात गस्त वाढवावी आणि हिंस्त्र श्वापदाचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी सायंकाळच्या वेळी एकटे बाहेर पडू नये,सतर्क रहा,सावध रहा .असे आवाहन करण्यात आले आहे.





Post a Comment

0 Comments

Top Post Ad