Type Here to Get Search Results !

वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,



नवराष्ट्र मराठीन्यूज,




www.navrashtramarathi.in.net




मुख्यसंपादक - 

नाशिक : मनाला चटका लावून जाणारी घटना बागलाण तालुक्यात घडली आहे. कांदा वाचविण्यासाठी शेताच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्याच्या अंगावर झाडाची फांदी पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात गेला जीव; वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बागलाण तालुक्यातील घटना.

Navrashtra Marathi,

सटाणा :नियमित बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कांदा वाचविण्यासाठी शेताकडे धाव घेतलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या अंगावर वादळी वाऱ्यात झाडाची फांदी पडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ७) दुपारी दोनच्या सुमारास बिजोटे-आखतवाडे रस्त्यावर ही घटना घडली. बापू सखाराम जाधव वय वर्षे ६०, रा. बिजोटे, ता. बागलाण असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


बागलाण तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू,

मिळालेल्या माहितीनुसार, बापू जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांची शेती बिजोटे-जायखेडा रस्त्यावरील गट क्रमांक १७१ मध्ये आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा उघड्यावर असल्याने वातावरणात अचानक बदल होताच त्यांची चिंता वाढली होती. दरम्यान, ते नातेवाइकांच्या लग्नसमारंभासाठी नामपूर येथे गेले होते. दुपारनंतर वादळी वारे सुरू झाल्याने आणि पावसाची चिन्हे दिसू लागल्याने त्यांनी तातडीने आपल्या लुना वाहनाने शेताकडे धाव घेतली. कांद्याच्या पोळ्या झाकण्यासाठी ते निघाले होते.


Navrashtra Marathi,


वादळाच्या तडाख्याने गाठलं मृत्यूला,

बिजोटेजवळील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय परिसरात पोहोचताच वादळाच्या तडाख्याने झाडाची मोठी फांदी बापू जाधव यांच्या अंगावर कोसळली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले, तर त्यांची लुना काही अंतरावर जाऊन पडली. आवाज ऐकून परिसरातील शेतकरी मदतीला धावले. सरपंच पोपट जाधव यांनी जायखेडा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी जखमी बापू जाधव यांना रुग्णवाहिकेतून नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वराज देशमुख यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.


शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार,

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र बच्छाव पुढील तपास करीत आहेत. सायंकाळी बिजोटे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad