Type Here to Get Search Results !

उघड्या कारमधून ७ किलो चांदीसह लाखोंचा मुद्देमाल गायब!सराफा व्यापाऱ्याला मोठा धक्का;

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक - 


जालना : जिल्ह्यातील अंबड शहरात मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील होलसेल सराफा व्यापारी मयूर सुराणा हे आपली कार क्रमांक एम. एच.२० जी. क्यू.२५९५ मध्ये चांदीचे दागिने व्यापाऱ्यांना देण्यासाठी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आले होते. काही व्यापाऱ्यांना चांदीचे दागिने देऊन रोख रक्कम व चांदीचे दागिने बॅगेत टाकून कारमध्ये ठेवली होती. मात्र त्यांच्या कारचा दरवाजा उघडा असल्याने अज्ञात चोरट्याने संधी साधून सात किलो चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून १५ लाख ४२ हजार रुपयावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.


सविस्तर वृत्त,

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सराफा व्यापारी मयूर सुराणा हे शहरातील सराफा व्यापाऱ्यांना चांदीचे दागिने देत असताना त्यांच्यावर पाळत ठेवली होती.माऊली ज्वेलर्स,साई ज्वेलर्स यांना चांदीचे दागिने देऊन शिवकृपा ज्वेलर्स मध्ये गेले असता त्यांच्या कारचा दरवाजा उघडा होता. त्याचवेळी संधी साधत अज्ञात चोरट्याने दुकानाच्या विरोध दिशेचा दरवाजा उघडून कारमध्ये प्रवेश करत बॅग घेऊन पाठीमागून आलेल्या हेल्मेटधारी दुचाकीवर बसून सुसाट वाऱ्याच्या वेगाने घटनास्थळावरून तात्काळ पलायन केले.


हि गोष्ट समोरच्या एका किराणा दुकानातील कामगाराच्या लक्षात येताच.त्याने शिवकृपा दुकानाचे चालक राहुल अंबिलवादे यांना याबाबत माहिती दिली.यावेळी सुराणा यांच्या लक्षात आले की, कारमध्ये ठेवलेली बॅग चोरीला गेली. त्यानंतर अंबड शहर सराफा असोशियनचे अध्यक्ष गोपाल उदावंत यांना माहिती मिळताच त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले




पुढील तपास सुरु आहे,

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हि घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज घेतले आहे.अंबड पोलिस ठाण्यात व्यापारी मयूर सुराणा यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हंटले की, सहा लाख रुपये किंमतीचे ज्यामध्ये चांदीचे जेन्टस कडे, चांदीचे जोडवे, अंगुठी, चांदीची चैन मिळून ५.७८० किलो ग्राम वजनाचे चांदीचे दागिने व रोख ४३ हजार  रुपये मिळून एकूण ६ लाख ४२  हजार रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला आहे. अंबड पोलिस ठाण्यात बुधवारी अज्ञात चोरट्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल गुरले हे करत आहे.

.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad