Type Here to Get Search Results !

HSRP नंबर प्लेटबद्दल मोठी अपडेट; आता 'ही' तारीख शेवटची, पुन्हा मुदतवाढ नाही,

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,

नवराष्ट्र मराठीन्यूज,

www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक -

मुंबई : यापूर्वी HSRP नंबर प्लेटबसवणे या प्रक्रियेसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यात सुरू असलेल्या HSRP बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर परिवहन विभागाने वाहनधारकांना आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुमच्याकडे १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेले वाहन असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच HSRP (High Security Registration Plate) बसविण्याबाबत सरकारने मोठे अपडेट दिले आहे. वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेऊन मुदतवाढ देण्यात आली असली, तरी आता ही अंतिम संधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी या प्रक्रियेसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यात सुरू असलेल्या HSRP बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर परिवहन विभागाने वाहनधारकांना आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.



३० जून पर्यंत मुदतवाढ,

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ३० जून २०२६ पर्यंत वाहनांवर HSRP बसवून घेण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. मात्र यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सरकारच्या मते, HSRP ही केवळ नंबर प्लेट नसून वाहन सुरक्षेसाठी महत्त्वाची यंत्रणा आहे. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता जुन्या वाहनांनाही ही प्लेट लावणे आवश्यक करण्यात आले आहे.
HSRP बसविण्यासाठी काय करावे?वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आगाऊ अपॉइंटमेंट बुक करावी. त्यानंतर ठरलेल्या वेळेनुसार वाहनावर HSRP प्लेट बसवून घेता येईल.

परिवहन विभागाचा स्पष्ट इशारा,

परिवहन विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, ज्या वाहनधारकांनी ३० जून २०२६ पर्यंत HSRP बसवली नाही किंवा अपॉइंटमेंटही घेतली नाही, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी केली जाईल.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून १ हजार रुपयांपर्यंत दंड (Compounding Fees) आकारला जाऊ शकतो.तसेच वाहनधारकांना एक महत्त्वाचा सल्लाही देण्यात आला आहे. HSRP साठी नोंदणी करताना केवळ अधिकृत वेबसाइटचाच वापर करा आणि कोणत्याही एजंट किंवा अनधिकृत व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नका.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad