आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -
नाशिकच्या बहुचर्चित म्हाडा भूखंड घोटाळ्यात मोठी कारवाई!
बनावट नकाशे, खोटे शिक्के आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासात नाशिक पोलिसांनी दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये -
१.कल्पेश आबाजी पाटील - नगररचना विभागाचे सहायक संचालक
२.बिपीन चंद्रकांत काजळे - भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक
यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, बिपीन काजळे हे याच म्हाडा प्रकरणात सुरुवातीला फिर्यादी होते!
प्रकरण काय आहे?
नाशिकमधील म्हाडा भूखंड प्रकरणात बनावट शिक्के आणि नकाशांच्या आधारे शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. तपासात असे समोर आले आहे की,
▪️ गृहनिर्माण योजनेसाठी आवश्यक २०% जागा उपलब्ध करून न देता मंजुरी घेण्यात आली
▪️ म्हाडा, महसूल, भूमी अभिलेख आणि नगररचना विभागाची दिशाभूल करण्यात आली
▪️ बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर झाला
▪️ काही जणांना “ना हरकत प्रमाणपत्र” देऊन गुन्ह्यातून वगळण्याचा प्रयत्न झाला असल्याचा संशय.
सरकारी बाजूने न्यायालयात सांगण्यात आले की,
या प्रकरणात हस्ताक्षर नमुने, शिक्के कुठे तयार झाले, आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपींची साखळी तपासणे बाकी आहे. त्यामुळे पोलीस कोठडी आवश्यक होती.आतापर्यंत या प्रकरणात ५ जणांना अटक झाली आहे.
यामध्ये अटक झाली आहे,
▪️ दिनेश कन्हैयालाल मानवणी
▪️ दीपक भगवानदास करमचंदणी
▪️ नितीन आबाजी पाटील
यांचाही समावेश असून काहींना जामीन मंजूर झाला आहे.
नाशिक म्हाडा घोटाळा आता केवळ जमीन व्यवहारापुरता मर्यादित नसून, त्यामध्ये शासकीय यंत्रणेतील संगनमत, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक फायद्यांचे गंभीर आरोप समोर येत आहेत.

Post a Comment
0 Comments