Type Here to Get Search Results !

नीट परीक्षा २०२६ रद्द, पुन्हा परीक्षा घेतली जाईल - सिबिआय


आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक -

मोठा दणका! थेट नीट परीक्षा 2026 रद्द, सीबीआयने आदेश काढत..

NEET Exam 2026 Cancelled : नुकताच मोठा निर्णय घेत घेत नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली. पेपरफुटीचे आरोप केले जात होते. शेवटी सीबीआयने चाैकशीचे आदेश देत थेट नीट परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला.





पेपर लीक प्रकरण,

नुकताच अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. पेपर लीक झाल्यानंतर थेट नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली. पेपर लीक झाल्यानंतर सीबीआयने या प्रकरणात थेट परीक्षा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. पेपरफुटी प्रकरणात चाैकशीचे आदेश सीबीआयकडून देण्यात आले. संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार आहे. नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आल्याने एकच मोठी खळबळ उडालीये. 3 मे रोजी नीट परीक्षाचा पेपर झाला होता. मात्र, त्यानंतर पेपरफुटीचे प्रकरण पुढे आले. 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली. नीट परीक्षा 2026 प्रकरणी अखेर सीबीआयने चाैकशीचे आदेश दिले आहेत. सीबीआयकडून या प्रकरणी आता चाैकशी केली जाणार आहे. विद्यार्थी संभ्रमात आहेत. पेपरफुटीचा दणका विद्यार्थ्यांना बसताना दिसत आहे.


विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागणार,

3 मे रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे. राजस्थानमध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा आरोप केला जात होता. काही प्रकरणेही पुढे आली, ज्यानंतर सीबीआयने थेट परीक्षा रद्द करण्याचा आदेश जारी केला. पेपर फुटीच्या आरोपानंतर हे मोठे पाऊस उचलण्यात आले.


केंद्रीय यंत्रणेकडे तपास,

एनटीएने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, 8 मे रोजी या प्रकरणातील पडताळणी करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडे तपास सोपवण्यात आला. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्याची परीक्षा प्रक्रिया पुढे चालू ठेवता येणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे आहे.


सविस्तर तपास केला जाईल,











त्यामुळेच ही परीक्षा रद्द करण्याचा सर्वात कठीण निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने आता संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला आहे. तपास यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करतील आणि सर्व नोंदी, कागदपत्रे व इतर आवश्यक साहित्य पुरवले जाईल, असेही एनटीएने म्हटले आहे. कथित पेपरफुटीच्या नेटवर्कची व्याप्ती, त्यात कोण कोण सामील आहे आणि नक्की कुठे पेपरफुटी झाली आणि कशी झाली याचा सविस्तर तपास हा केला जाईल

Post a Comment

0 Comments

Top Post Ad