Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

कुंभेफळ परिसरात जोरदार पावसाची हजेरी भुईमूग शेतकऱ्यांचे अतोनात हाल,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


जिल्हा प्रतिनिधी: समाधान राठोड,

बुलढाणा: सिंदखेडराजा तालुक्यातील कुंभेफळ गावात व परिसरात सोमवारी रात्री सुमारे 7.30 वाजेच्या सुमारास वादळी पावसाची जोरदार हजेरी लागली असून शेतातील शेतकरी व शेतमजूर घरी येत असताना अचानक वादळ व पाणी तसेच जोरदार गारांची सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल झाले.वादळ एवढ तीव्र होत की  मोठमोठी झाडे कोसळून पडले. पावसाचा पूर्व अंदाज नसल्यामुळे शेतातून घरी येणाऱ्या शेतकऱ्यांचे खूप हाल झाले.




काही शेतकऱ्यांचे उन्हाळी भुईमूग पीक काढून शेतात पडलेले होते त्यापासून जणाववारांना चारा मिळतो तो चारा ओलाच भिजल्यामुळे सडण्याची शक्यता नाकारता येत नाही व भुईमूग शेंगा ओल्या असतानाच अचानक आलेल्या पावसाने आणी वादळाने शेतकऱ्यांना जमा करता आल्या नाही त्यामुळे उत्पनात सुद्धा घट होण्याची चिन्हे आहेत. अशा अवकाळी गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल झाले आहेत.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad