Type Here to Get Search Results !

आयटीआयमध्ये आता ईव्ही, ड्रोन, सोलारसह नवीन ट्रेड शिकता येणार,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी : दोन वर्षांत मिळू शकतो रोजगार, स्वतः ला करता येईल व्यवसाय,


बीड : राज्यातील शासकीय व खासगी आयटीआय प्रवेशासाठी २१ मेपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. ७ हजार नव्या जागांसह एकूण १ लाख ५७,६६४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. यंदा १३ 'न्यू एज' अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत. यात एआय, ईव्ही, सोलार, ड्रोन, अॅप टेस्टरसह एचआरचेही ट्रेड्स उपलब्ध असतील. बीड जिल्ह्यातही हे दोन्ही अभ्यासक्रम सध्या सुरु आहेत.

प्रशिक्षण आयटीआयमध्ये घेतल्यास कमी शैक्षणिक खर्च तसेच कमी कालावधीत विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी असल्याचे प्रवेश प्रक्रियेचे जिल्हा समन्वयक पवन रामदासी व बीडचे समन्वयक जे. एम.क्षीरसागर यांनी सांगितले.


बीड जिल्ह्यात कोणते अभ्यासक्रम

बीड येथील शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल मॅनेजमेंट तसेच आष्टी आणि माजलगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये सोलार टेक्निशियनचे अभ्यासक्रम आहेत.

जिल्ह्यात २६ आयटीआय मध्ये ३,५९६ जागा बीड जिल्ह्यात ११ शासकीय आयटीआयमध्ये २,१३२, तर १५ खासगी आयटीआयमध्ये १,४६४ अशा ३, ५९६ जागा आहेत.


आयटी आयमध्ये १३ अभ्यासक्रमांची भर,

आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील वाढत्या मागणीनुसार राज्यातील आयटीआयमध्ये १३ नवीन अभ्यासक्रमांची भर घातली आहे. यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इलेक्ट्रिक व्हेइकल मॅनेजमेंट, रोबोटिक्स, सोलार, ड्रोन टेक्नॉलॉजीसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.


आयटीआय प्रवेशासाठी अर्ज भरणे सुरू,

आयटीआयत ऑनलाइन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे २१ मेपासून सुरू झाले आहे.एआय, सोलार, ड्रोन, इव्हीमध्येही करिअरच्या संधी आधुनिक तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रात मागणी असल्याने एआय, सोलार, ड्रोन, ईव्हीसारखे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअर घडविण्याची संधी आहे.


.....असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक,

२१ मेपासून अर्ज भरणे, दुरूस्ती व प्रवेश शुल्क जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. १ जूनपासून पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प नोंदविता येणार आहे. दहावीची गुणपत्रिका संबंधित शाळेमार्फत वितरीत केल्यानंतर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.


पात्रता व निकष काय, कुठे करायचा अर्ज,

आयटीआयमधील प्रशिक्षणासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. https://admission.dvet.gov. in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. अर्जात दहावीच्या सर्व विषयांचे गुण नोंदविणे आवश्यक आहे.थेट कंपनीत 'प्रॅक्टिकल' आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेताना १५० तासांचे ऑन जॉब ट्रेनिंग असेल. त्यामुळे थेट कंपनीत जाऊन 'प्रॅक्टिकल' शिकता येणार आहे.


तरुणांनी करिअर घडवावे सध्या प्रत्येक ट्रेडच्या गरजेनुसार उद्योग क्षेत्रातील मोठ्या कंपन्या बीडमध्ये येत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. कमी कालावधीत शिक्षण पूर्ण करून तरुणांनी या संधींचा लाभ घेऊन करिअर करावे.

सदर माहिती डॉ. प्रवीणकुमार उखळीकर, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड यांचेकडून प्राप्त झाली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad