आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
ता. प्रतिनिधी: शिवाजी औदगे,
मेहकर : पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा, उकळी येथील विशेष शिक्षक तथा जनगणना 2027 अंतर्गत सर्कल क्रमांक 051 मधील प्रगणक (0323) आणि BLO म्हणून कार्यरत असलेले श्री. शैलेश रामराव देशमुख यांनी कर्तव्यनिष्ठा, सातत्य आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीचा आदर्श निर्माण केला आहे.
प्रशासनाकडून विशेष कौतुक,
निवडणूक विभागाचे केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाही, तब्बल ४५° सेल्सिअस तापमानामध्ये त्यांनी जनगणना व BLO चे काम अत्यंत कार्यतत्परतेने पूर्ण केले. कोणतेही काम वेळेत, अचूक आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचे प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
तालुक्यातुन काम प्रथम पूर्ण केल्याबद्दल केला सत्कार,
तालुक्यातून प्रथम काम पूर्ण करण्याचा मान मिळवल्याबद्दल तहसीलदार तथा जनगणना चार्ज अधिकारी मा. श्री. निलेश मडके साहेब, नायब तहसीलदार मा. श्री. नितीन बोरकर साहेब तसेच सर्कलचे पर्यवेक्षक मा. श्री. गणेश ओव्हर सर (प्राचार्य) यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
श्री. देशमुख यांच्या मेहनती, प्रामाणिकपणा व सेवाभावी वृत्तीमुळे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.

Post a Comment
0 Comments