Type Here to Get Search Results !

लोणार तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक! जेसीबीच्या साहाय्याने रेतीचा अवैध उपसा !

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

१० जून रोजी रेती घाट बंद होण्याची शक्यता!

लोणार : तालुक्यात अवैधरीत्या रेती वाहतुकीने पुन्हा डोके वर काढले असून, महसूल विभागाच्या ढीसाळ कारभारामुळे वाळू माफियांचे तालुक्यातील दोनअसल्याचा आरोप होत आहे. तहसीलदारांकडून वाहन तपासणी केली जात असली तरी रात्रीच्या वेळी टिप्परने क्षमतेपेक्षा जास्त रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. रात्री सात ते आठच्या ""दरम्यान अनेक टिप्पर राजरोसपणे मार्गक्रमण करत आहेत. मागील तीन ते चार महिन्यांत केवळ एक-दोन फावल्याचे चित्र आहे.रेती घाटांवर नियमांची पायमल्ली करत जेसीबी,पोकलँड मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या प्रकाराकडे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कीरकोळ कारवाया झाल्याचे समोर आले आहे. मोठी कारवाई करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले नसल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा आहे. १० जूनपासून रेती घाट बंद होण्याची शक्यता असल्याने शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा होत आहे.


तहसीलदार भूषण पाटील यांचे आव्हान,

जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार रेतीच्या अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून तपासणी राबविण्यात येत आहे. रात्री- अपरात्री होणारी रेतीची अवैध वाहतूक, साठवणूक अथवा उत्खननाबाबत नागरिकांनी तत्काळ माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल. अवैध रेती माफियांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

 - भूषण पाटील तहसीलदार लोणार,

Post a Comment

0 Comments

Top Post Ad