Type Here to Get Search Results !

४५ वर्षे शिवसेनेत राहिलेले मंत्री गुलाबराव पाटील लवकरच भाजपमध्ये?जळगावमध्ये राजकीय भूकंप होण्याचे संकेत …

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक :


जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीला आता निर्णायक वळण मिळाले आहे. जळगावची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात असून, त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेशाच्या रंगलेल्या चर्चांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. (Photo: AI Generated)

महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चांमध्ये जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले संख्याबळ अधिक असल्याचा दावा करत शिवसेना शिंदे गटाने या जागेवर जोरदार दावा केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत पुत्र प्रताप पाटील यांच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार पाठपुरावा केला होता. त्यासाठी स्थानिक पातळीवर संघटनात्मक हालचालीदेखील वेगाने सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, भाजपने जळगावची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे कायम ठेवण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट झाले आहे.


हेही वाचा

गुलाबराव पाटलांना धक्का… जळगावमधील विधान परिषदेची जागा शिवसेना शिंदे गटाला नाहीच..?


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील आपली राजकीय पकड अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने भाजपने ही जागा सोडण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचे मानले जात आहे.

महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चांमध्ये जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता.


भाजप प्रवेशाचे संकेत,

दरम्यान, जागा न मिळाल्यास गुलाबराव पाटील आणि त्यांचे पुत्र प्रताप पाटील थेट भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. त्यांनी थेट प्रवेशाबाबत स्पष्ट संकेत दिले नसले तरी त्यांच्या भूमिकेमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. जळगावच्या राजकारणात गुलाबराव पाटील हे प्रभावी नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे केवळ जळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर राज्यातील महायुतीतील नेत्यांचेही लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर जळगावच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.. 


भाजपने आधीच दिली होती ऑफर,

माननीय पालकमंत्री पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांना भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आधीच थेट ऑफर दिल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात, प्रताप पाटील यांनी त्या वृत्ताचे खंडनही केले होते. त्यानंतर आता जळगावची जागा भाजपकडेच जाणार असल्याने स्वतः पालकमंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या मुलासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.


गुलाबराव पाटील काय म्हणाले,

त्याविषयी जळगावमध्ये पत्रकारांनी विचारणा केल्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, की गेली ४५ वर्षे मी शिवसेनेत घातली. आताही मी शिवसेनेचा मंत्री आहे. माझ्यावर शंका घेणे उचित नाही. जळगावच्या जागेसंदर्भात मी यापूर्वी दोन वेळा आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. एकाच विषयावर वारंवार बोलणे योग्य नाही. शेवटी महायुतीचे अमर, अकबर, अँथोनी हे तिघेच जागा वाटपाचा निर्णय घेतील.


जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेशाच्या रंगलेल्या चर्चांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad