आंतरराष्ट्रीय
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -
सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. आई, मुलगी व मुलगा यांचा वेगवेगळ्या ठिकाणी खून झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.७५ लाखाच्या जमिनीसाठी हत्या केली अशी माहिती आहे.
एकाच कुटुंबातील ३ जणांची हत्या,
माहितीनुसार, गावातील गायत्री सुधाकर मस्के (वय ४०), त्यांची मुलगी प्रिया मस्के (वय १८) आणि मुलगा शिवराज मस्के (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
प्राथमिक माहिती,
प्राथमिक माहितीनुसार, ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. घटनेचे स्वरूप पाहता ही हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे समोर आले आहे.आई आणि मुलगी यांचे मृतदेह घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळले, तर मुलगा शिवराज याचा मृतदेह शेताजवळ सापडला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनेमुळे गावकर्यांमध्ये भीती,
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.अजुन एक दुर्देवाची बाब म्हणजे मृत तरुणी प्रिया ही बारावीच्या परीक्षेत पास झाली आहे आणि तिला ६८ टक्के गुण मिळाले होते.काय घडतंय या राज्यात काही कळे ना कायद्याचा धाक कोणालाही राहिला नाही आरोपींना लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे हीच भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल

Post a Comment
0 Comments