Type Here to Get Search Results !

उमरखेड येथे फेसबुक पोस्टमुळे गुन्हा दाखल,पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर भोवला,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net



मुख्यसंपादक -

 उमरखेड- फेसबुकवरील 'यवतमाळ ग्रुप' या सार्वजनिक ग्रुपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर व्यक्तींविषयी आक्षेपार्ह, अश्लील आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी दीपक झिल्टे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.आरोपीने सुमारे ४९५०० सदस्य असलेल्या या ग्रुपमध्ये जाणीवपूर्वक व द्वेषभावनेतून पोस्ट प्रसारित केली. या मजकुरातून पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचा तसेच समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोस्टमध्ये काही इतर राजकीय व्यक्तींचाही उल्लेख असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मजकूरामुळे सामाजिक शांतता.




पोलिसांकडून तपास सुरु

कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे संबंधित फेसबुक अकाउंटची चौकशी, आयपी अॅड्रेस व लॉग्स मिळवणे तसेच आक्षेपार्ह पोस्ट हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी डिजीटल फॉरेन्सिक तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सुरू आहे.

=

Post a Comment

0 Comments