आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -
तामिळनाडू - तामिळनाडूच्या राजकारणात उलथापालथ,सुपरस्टार थलपती विजय मुख्यमंत्री बनणार? संपूर्ण गणिते बदलून टाकली. अभिनेता थलापती विजय याने तामिळनाडूच्या राजकारणाची संपूर्ण गणिते बदलून टाकली आहे. सुरुवातीच्या कलांमध्येच स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष आणि एआयएडीएमके यांच्यात चुरशीची लढत होती, त्यांच्या तुलनेत थलपती विजय काहीसे मागे होते. परंतु सव्वा नऊ वाजताच्या सुमारास हाती आलेल्या कलांनुसार थलपती विजय यांनी दोन्ही प्रमुख पक्षांना मागे सारले.
तामिळनाडुत सत्ता पालट,
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निकालात धक्कादायक कल हाती आले असून तामिळी जनतेने सुपरस्टार थलपती विजय यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचे सुरुवातीच्या कलांवर स्पष्ट होत आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत द्रविड मुन्नेत्र कळघम आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यातच प्रामुख्याने राजकीय लढाई होत असे. परंतु यंदा तामिळी अभिनेता थलापती विजय याने निवडणुकीची संपूर्ण गणिते बदलून टाकली आहे. सुरुवातीच्या कलांमध्येच स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष आणि एआयएडीएमके यांच्यात चुरशीची लढत होती, त्यांच्या तुलनेत थलपती विजय काहीसे मागे होते. परंतु सव्वा नऊ वाजताच्या सुमारास हाती आलेल्या कलांनुसार थलपती विजय यांनी दोन्ही प्रमुख पक्षांना मागे सारून ७५ जागांवर आघाडी मिळवली. धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मतदारसंघात थलपती यांच्या टीव्हीके पक्षाचे उमेदवार व्ही एस बाबू आघाडीवर होते.
थलपतीची पहिलीच निवडणूक,
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांची पहिलीच निवडणूक असून पेरम्बूर विधानसभा मतदारसंघातून ते लढवत आहेत. तामिळनाडूच्या सर्वच विधानसभा जागांवर त्यांनी आपल्या तमिळगा वेट्री कळघम पक्षाचे उमेदवार उभे करून प्रस्थापित पक्षांना हादरे देण्याची रणनीती आखली आहे. त्यांची हीच रणनीती यशस्वी होताना दिसून येत आहे.
सिनेसृष्टीतून राजकारणात पाऊल,
थलपती विजय याने सिनेसृष्टीतून राजकारणात पाऊल टाकण्याचे ठरवले. थलपतीच्या घोषणेला तामिळी जनतेने जोरदार प्रतिसाद दिला. गेल्या काही महिन्यांपासून थलपतीने तामिळी जनतेच्या प्रश्नांवर जोरदार उठवला होता. त्याचमुळे युवकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्येही त्याची अफाट लोकप्रियता होती. निवडणूक प्रचारातही त्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला पक्ष घराघरात पोहोचवला. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास पाहिला असता सिनेमासृष्टीच्या भोवती तेथील राजकारण फिरते. त्याचे प्रमुख उदाहरण म्हणजे जयललिता... त्यांच्यानंतर सिनेसृष्टीतून येऊन जनतेच्या पसंतीने विजय महत्त्वाच्या खुर्चीवर बसू शकतो, असे आत्ताच्या कलांनुसार दिसते.

Post a Comment
0 Comments