आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक:
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली वन विभागाने मोठी धडक कारवाई करत मेरा बुद्रुक परिसरातून तब्बल दोन लाख रुपये किमतीचा अवैध लाकूड साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, वन विभाग आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आल्याचे चित्र दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८ मे २०२६ रोजी बुलढाणा वन विभागाला मेरा बुद्रुक शिवारात विनापरवाना लिंबाच्या आणि इतर अडजात प्रजातींच्या लाकडाचा अवैध मोठा साठा करून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खात्री करून वन विभागाच्या पथकाने परिसरात अचानक छापा टाकला.
२ लाख रुपये किमतीचा लाकूड साठा जप्त,
उपवनसंरक्षक बुलढाणा श्री. जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये बाजारमूल्य असलेला लाकूड साठा जप्त करण्यात आला. अंचरवाडी बिटचे वनरक्षक गजानन माणिकराव पोटे यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण कारवाई केली.
विना परवाना होता लाकूड साठा,
छाप्यादरम्यान कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसताना साठवून ठेवलेले मौल्यवान लाकूड वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून, तपास अधिक वेगाने करण्यात येत असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून मेरा बुद्रुक परिसरात होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर वन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे गतिमान केली होती.
या कारवाईत वनरक्षक गजानन माणिकराव पोटे, वनसेवक ऋषिकेश तुपकर यांनी सहभाग घेतला. तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व कॅम्पा बुलढाणा श्री. वैभव काकडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकरणाचा तपास वनपाल प्रदीप प्रकाश मुंढे हे करत आहेत.
डीएफओ जमीर शेख यांचा इशारा,
“पर्यावरणाचा ऱ्हास करणारी आणि विनापरवाना वृक्षतोड करणारी कोणतीही टोळी असो, त्यांची गय केली जाणार नाही. मेरा बुद्रुक येथील कारवाई ही केवळ सुरुवात असून, मुख्य आरोपींपर्यंत वन विभाग लवकरच पोहोचेल,” असा इशारा उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख यांनी दिला.

Post a Comment
0 Comments