Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

अंधेरी स्टेशनवर दुर्घटना, लोकलखाली अडकला प्रवासी,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक -

मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक येथे एक धक्कादायक अपघात घडला असून, लोकल ट्रेनखाली आल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातानंतर संबंधित व्यक्ती रेल्वे रुळांजवळ गंभीर अवस्थेत तडफडताना दिसल्याने स्थानकावर एकच खळबळ उडाली.




घटनेनंतर प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिस आणि प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेकांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.


दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार चालती ट्रेन पकडण्याचा किंवा रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.


रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करत, चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न आणि रुळ ओलांडणे जीवघेणे ठरू शकते, असे आव्हान केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad