Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायतमध्ये 16.77 लाख रूपयांचा आर्थिक घोटाळा, महिला सरपंच निलंबित,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

सातारा: जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या खेड ग्रामपंचायतीमध्ये 16.77 लाख रूपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सरपंच लता फरांदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या कारवाईमुळे खेडसह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.



चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश,

मिळालेल्या माहितीनुसार, माहितीच्या अधिकारात साहिल अकबर शेख यांनी हा घोटाळा उघडकीस आणला. यानंतर त्यांनी खेड ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांत अपहार झाल्याची तक्रार गटविकास अधिकार्यांरकडे केली. तक्रारीवर गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांगना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.


अनियमितता झाल्याचा ठपका,

याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात खेड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले. अहवालात अनेक बाबींमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते. विकासकामांच्या निविदा न करणे, कामांचे अंदाजपत्रक व तांत्रिक मंजुरी नसणे व कामांची मोजमापे पुस्तकांमध्ये नसताना देखील बिल अदा करणे, अशी अनेक प्रकारची अनिमियतता झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला.


निधीवापरात पारदर्शकताअसल्याचे निस्पन्न,

त्यानंतर फेरचौकशी करण्यात आली असता काही आरोप अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीच्या वापरात पारदर्शकता नसल्याचे आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या गैरव्यवहाराचा ठपका सरपंच लता फरांदे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव यांच्यावर ठेवण्यात आला. यानंतर विभागीय आयुक्तांनी सरपंच लता फरांदे यांना पदावरून निलंबित करण्याचा अंतिम आदेश दिला. यापूर्वी ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव यांनाही निलंबित करण्यात आले.


रक्कम वसुलीचेनिर्देश,

गेल्या वर्षी या दोघांकडून या घोटाळ्याची रक्कम वसूल करण्याचे आदेशही गटविकास अधिकार्यांकडून देण्यात आले होते. गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सरपंच लता फरांदे आणि ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांच्याकडून प्रत्येकी 8 लाख 39 हजार 572 रुपये म्हणजे दोघांकडून 16 लाख 77 हजार 143 रुपये वसुल करण्याचे आदेश दिले होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad